eng
competition

Text Practice Mode

मराठी 30 wpm practice passage

created May 14th 2019, 04:48 by user1745543


2


Rating

118 words
1 completed
00:00
    ग्रामीण विकास संस्था महाराष्ट्रात बऱ्याच स्थापन झाल्या.  या संस्था प्रामुख्याने ग्रामीण जीवनाचे पुनरुथ्थान पुनर्रचना करण्याच्या हेतूने स्थापन झाल्या. खेड्यातील शेतकरी या देशातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे.  ग्रामीण जीवनाचा पाया हा शेती असल्याने संस्थांनी सर्व कार्यक्रमांमध्ये शेतीलाच तदअनुषंगिक कार्यक्रमांना अग्रस्थान दिले आहे.  ग्रामीण जीवनातील व्यथा आणि उणीवांचा सखेल अभ्यास करून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे हा संस्थांचा प्रमुख हेतू आहे.
    या संस्थांनी मुख्यत्वेकरून ग्रामीण जीवनातील सर्वांत खालच्या थरातील जनसमुहावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.  भूमिहीन मजूर, बेरोजगार ग्रामीण युवक, लहान अपुरी उत्पादन साधने असणारे शेतकरी, आधुनिक अर्थव्यवस्थेमुळे उपजीविकेची साधने गमावून बसलेले विविध प्रकारचे कारागीर आणिबलुतेदार पददलित वर्ग अशा ग्रामीण समाजजीवनातील विविध व्थित वर्गामध्ये संस्थांची कार्ये चालू आहेत.
    या संस्थांची कामगिरी आत्मविश्वासाने आणि जोमाने सुरू आहे.
 

saving score / loading statistics ...